'देवभोळी' प्रजा इथली,
उगा रणांगण लढवत राहीली.
पावलोपावली उभा ठाकला;
'देव' त्यांना का न दिसला.
नव्याने पुन्हा मंथन चालले,
अमृतासवे विष ही निघाले.
'शंकर' होऊन ते पुढ्यात आले,
विषाचे प्याले ही त्यांनी रिचवले.
कधी संगीनी, कधी रणरागिणी,
वसते 'दुर्गा' प्रत्येक अंगणी.
नव्या शोधाची होऊन जननी,
'सरस्वती' राबते रात्रंदिनी.
दाटते भोवताली सावळ छाया,
त्यातही गवसे मज 'विठूराया'.
नेहमी त्यांनी होऊन 'राम',
किती पाळावा सांग संयम.
सुटले हात; निसटले श्वास;
तरिही संपेना ध्यास.
तुटले सगळे मोहपाश ;
जिवंत फक्त एक आस.
डोईवरती धरून छाया,
उभे गर्द निळे आभाळ.
निळ्या राधेयाची ती काया,
कशी सावरेल बघ काळ.
-अर्चना
https://anchor.fm/dr-sachin-s-mali

पावलोपावली उभा ठाकला;
'देव' त्यांना का न दिसला.
नव्याने पुन्हा मंथन चालले,
अमृतासवे विष ही निघाले.
'शंकर' होऊन ते पुढ्यात आले,
विषाचे प्याले ही त्यांनी रिचवले.
कधी संगीनी, कधी रणरागिणी,
वसते 'दुर्गा' प्रत्येक अंगणी.
नव्या शोधाची होऊन जननी,
'सरस्वती' राबते रात्रंदिनी.
दाटते भोवताली सावळ छाया,
त्यातही गवसे मज 'विठूराया'.
नेहमी त्यांनी होऊन 'राम',
किती पाळावा सांग संयम.
सुटले हात; निसटले श्वास;
तरिही संपेना ध्यास.
तुटले सगळे मोहपाश ;
जिवंत फक्त एक आस.
डोईवरती धरून छाया,
उभे गर्द निळे आभाळ.
निळ्या राधेयाची ती काया,
कशी सावरेल बघ काळ.
-अर्चना
https://anchor.fm/dr-sachin-s-mali
Nice sir
ReplyDeletenice sir😊
ReplyDelete